“सिगुदा” तरूण पिढी : आत्मघातकी तरूणाई- प्रा. डॉ.सुधीर गव्हाणे

dr sudhir gavhane article about young people

प्रा. डॉ.सुधीर गव्हाणे – तुम्हाला या लेखाच्या शिर्षकातील ” सिगुदा” शब्द वाचून तुम्ही भांबावून गेला असाल ना? काय अर्थ आहे या शब्दाचा ? हा शब्द तुम्ही आधी कधी वाचला असण्याची सुतराम शक्यता नाही, कारण हा शब्द नव्यानेच तयार केलाय मी. “सिगुदा ” म्हणजे काय मग? ही कशा प्रकारची ही तरूण पिढी आहे हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल . तुमची उत्सुकता ज्यास्त न ताणता मी सांगतो मला काय म्हणायचंय . सिगुदा म्हणजे सिगारेट , गुटखा व दारु यांच्या आधीन झालेली तरूण पिढी. सिगुदा तरूण पिढी म्हणजे या तीन व्यसनांच्या आहारी गेलेली तरूणाई होय.

भारतात कुठेही जा , खेड्यापाड्यातील तरूणांना पहा नाहीतर शहरातील झोपड़पट्टी किंवा उच्चभ्रू वर्गातील तरूण पहा . या वर्गातील मॉड फँशनेबल तरूणीही पहा. या सर्वांना सिगारेट , गुटखा व दारू यांचे व्यसन लागलेले दिसते. अर्थात यालाही निर्व्यसनी तरूणांचाही अपवाद आहे , पण प्रमाण अतिशय कमी. शहरातील बड्या घरातील मुले व मुली मादक द्रव्यांच्या रेव्ह पार्ट्या करताना दिसतात. त्या संस्कृतीत तर न पिणारा म्हणजे मागासलेला मानला जातो. सिगारेटमध्ये मादक द्रव्य धालून पिणारेही काही कमी नाहीत. यात ग़रीब व श्रीमंत असा भेद राहिलेला नाही. यात समता पक्की आहे . समाजात समता कधी येईल हे सांगता येत नाही , पण सिगुदा तरूणांत समता आनंदानं वावरताना दिसतेय.

Loading...

गावोगावच्या पानटपरी , किराणा दुकानें गुटख्यांच्या पुड्यांनी भरलेली असतात. भारताला ” भारत हा गुटख्यांचा देश आहे ” असे म्हणता येईल. भारतात जागजागी कचरा नि गुटखा यांचे थैमान चालू आहे. तरूण पिढी या तीन व्यसनांच्या इतके आहारी गेलेयत की अक्षरश: आपलं आयुष्य ते उध्वस्त करताहेत हे सांगायला कुणा तज्ज्ञाची गरज आहे काय ? कुठल्याही शहरात नाहीतर खेड्यात जा . सारी गावं दारूच्या हॉटेलांनी नि बारनी भरलेली दिसतात. सर्व धंद्यांना कधी न कधी मंदी येऊ शकते पण या धंद्यांना मंदी येईल काय ? रात्र झाली की गाठ बार नि ढोस दारू नि पी सिगारेट हे घातक चित्र आपण पहात नाही काय? रस्त्यांनी चालताना पुड्यांची पाकीटे चहूदिशांनी पसरलेली आपण दररोज पहात नाही काय ? १५ ते २० % युवक सोडले तर ८०% युवक “सिगुदा ” पिढी झालेली नाही काय ? हेच सिगुदा तरूण मग मद्यधुंद होऊन महिला , तरूणींवर अत्याचार करायलाही आघाडीवर असतात. आपल्या तरूण पिढीची ही व्यसनाधिनता तरूणांना नासवून टाकतेय .

ज्या देशातील तरूण असे व्यसनांच्या नादी लागून आपलं आयुष्य सडवातात , त्या देशाचं भवितव्य सुपर पॉवर होण्याचं राहू शकतं काय ? ही तरूणाईची वाटचाल आत्मघाताच्या दिशेने होतेय ही चिंतनीय बाब नव्हे काय ? आपण व्यसनी पिढी निर्माण करतो आहोत ना? तरूणांना या आत्मघातापासून कोण नि कसं वाचवणार ?

लेखक-  PROF. DR. SUDHIR GAVHANE, Media& Higher Education Expert , Retired University teacher with 34 years experience at BAMU AURANGABAD [MAHARASHTRA] INDIA. Now Dean at MIT-WPU Pune.
Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'दिवसातून काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्यावी'
वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
#Corona : लॉकडाऊन संपल्यानंतरही  'या' गोष्टी राहणार बंद
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत - रुपाली चाकणकर
हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मनातील खंत
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
मोदींसोबतच्या बैठकीत संजय राऊत-शरद पवारांचा आरोप; 'राज्यपाल समांतर सरकार चालवताय'
औरंगाबादेत घडलेल्या 'या' घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
औरंगाबाद : कोरोनामुळे संपली माणुसकी
जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणावरून मनसेतील मतभिन्नता चव्हाट्यावर