खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ठरले बेस्ट युथ लीडर…!

मुंबई/प्राजक्त झावरे-पाटील : कल्याण लोकसभा क्षेत्राचे युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना नुकताच प्रतिष्ठेचा India Unbound Excellency चा Best Youth Leader चा पुरस्कार मिळाला. तात्याराव लहाने, उज्वल निकम, धनराज पिल्ले, IAS प्रावीण दराडे, IAS आश्विनी जोशी, IPS रवींद्र सिंघल , BSE चे आशिष चोहान, पत्रकार अलका धुपकर आदींना देखील वेगवेगळ्या प्रकारातून पुरस्कृत करण्यात आले. या पुरस्काराबद्दल डॉ. श्रीकांत शिंदे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये कल्याण लोकसभा क्षेत्रातून निवडून आलेले हे युवा खासदार त्यांच्या अफाट कामाच्या व जनसामान्यांच्या लोकसंपर्काच्या बाबतीत सर्वच अनुभवी खासदारांना मागे सोडताना दिसून येत आहेत. आपल्या लोकसभा क्षेत्रात अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचणारे खासदार म्हणून त्यांची ओळख तयार झाली आहे. खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावांची अवस्था पूर्वीसारखीच असताना डॉ. श्रीकांत यांनी दत्तक घेतलेल्या कल्याण मधील नागाव या गावाचा , गावाच्या शाळेचा त्यांनी केलेला कायापालट त्यांच्या कार्यक्षमतेचीच पावती देतो. तसेच त्यांच्या लोकसभा क्षेत्रातील हेमाडपंथी प्राचीन शिवमंदिराचा , त्या परिसराचा केलेला चमत्कारिक कायापालट राजकीय इच्छाशक्तीची जाणीव करून देतो. तेथील आर्ट फेस्टिव्हल भारतातील उत्तम आर्ट फेस्टिव्हल म्हणून नावाजला देखील जाऊ लागला आहे.

मतदारांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी डॉ. श्रीकांत नेहमीच अग्रभागी दिसून येत आहेत. ठाकुर्ली सारख्या रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण, रेल्वेच्या सुट्टीकरिताच्या अतिरिक्त गाड्यांचे थांबे , कल्याण-ठाणे जलमार्गासाठी स्वतः पुढाकार घेऊन केलेले सर्व्हे, कल्याण-कळवा मार्गे नवी मुंबई करीता नव्या रेल्वे ट्रॅक ची आग्रही मागणी, ठाणे – कल्याण – भिवंडी मेट्रो तसेच तळोजा मेट्रो डोंबिवली पर्यंत आणण्यासाठीचे प्रयत्न आदी बाबींच्या कामातून ते थेट सामान्य नागरिकांच्या अभिनंदनास पात्र ठरत आहेत. सरकारी रुग्णालयात उपलब्ध करून दिलेले वेगवेगळी आधुनिक साधने, रुग्णवाहिकासह इतर आरोग्य सेवांचा त्यांनी घेतलेला वसा त्यांच्या डॉक्टर असण्याला साजेशाच आहे.

शिवसेनेचा सुशिक्षित आणि तितकाच कार्यतत्पर चेहरा म्हणून हा युवा खासदार पुढे येत आहे. त्यांच्या सारखा लोकसभा क्षेत्रात जमिनीवर काम करणारा युवा खासदार खूप क्वचितच पाहायला मिळतो. वडीलांच्या पायावर पाय ठेवून जनमानसांच्या दुःखाचा अंत करण्यासाठी हा डॉक्टर आपलं भरीव योगदान देत आहे, म्हणून त्यांचा हा झालेला गौरव उचितच आहे असे विरोधकांसह सर्वच मान्य करतात.

बेरोजगारी संपवण्यासाठी शिवसेनेचा हा ‘फंडा’

आपल्यासमोर सर्वांच्या कॉलर खाली; उदयनराजेंच्याच स्टाईलमध्ये पवारसाहेबांचा टोला