माणसाची उत्क्रांती वानरापासून नाहीच; मोदी सरकारमधील मंत्र्यांचा अजब शोध

dr satypal singh

औरंगाबाद: मोदी सरकारमधील मंत्री काय अजब गजब विधान करतील याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. आता जगविख्यात शास्त्रज्ञ डार्विन यांनी मांडलेला मानव उत्क्रांतीच्या सिध्दांत खोटा असल्याचे अजब संशोधन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ सत्यपाल सिंह यांनी लावले आहे. अखिल भारतीय वैदिक संमेलनाच्या उद्घाटनासाठी ते औरंगाबाद येथे आले होते.

डार्विनने मांडलेला वानरांपासून मानवाची उत्पत्तीचा सिद्धांत जगमान्य आहे, मात्र हे मानायला सत्यपाल सिंह तयार नसल्याच दिसत आहे. कारण वानरापासून माणसाची उत्पत्ती होताना कोणी पाहिलं नाही. तसेच आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये वानरापासून मानवाची निर्मिती झाल्याच कोणीच म्हणाल नाही. त्यामुळे डार्विनचा विज्ञानातील सिद्धांत खोटा आणि साफ चुकीचा असल्याचा दावा सिंह यांनी केला आहे.

३५ वर्षापूर्वीच भारतीय शास्त्रज्ञांनी माणसाची उत्क्रांती वानरांपासून झाली नसल्याच सिध्द केल्याचा दावाही डॉ. सिंग यांनी केला. एवढ बोलूनच ते थांबले नाहीत तर थेट शाळा महाविद्यालयातील अभ्यासक्रमातून डार्विनचा सिद्धांत काढून टाकावा. तसेच पृथ्वीवर सुरुवातीपासून मनुष्य आहे व तो मनुष्य म्हणूनच राहणार असल्याच शिकवायला पाहिजे असल्याच ते म्हणाले.

Loading...