संजय राऊत यांच्यावर डॉ. स्वप्ना पाटकर याचे छळाचे आरोप ; कंगना राणौत म्हणाली…

संजय राऊत

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर एका डॉक्टर महिलेने छळाचे गंभीर आरोप केले आहेत. 2015 मध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बेतलेला बाळकडू चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांनीच संजय राऊतांवर छळाचे गंभीर आरोप केले आहेत.

स्वप्ना पाटकर यांनी आरोप केलाय की, शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’चे सह-संपादक संजय राऊत मागच्या 8 वर्षांपासून आपल्या पक्षाचे वजन वापरून शिवीगाळ करत आहेत, तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा आणि नातेवाइकांचाही छळ करत आहेत. या बाबत थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपली कैफियत मांडली.

पत्रात त्यांनी लिहिले आहे की, त्यांना वेगवेगळ्या पोलीस स्थानकांत अनेक प्रकरणांत चौकशीसाठी बोलावले जाते आणि विनाकारण त्रास दिला जातो. मला मारून टाकण्याआधी न्याय मिळावा अशी अपेक्षा देखील त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.

दरम्यान, आता बॉलीवूड अभिनेत्री तसेच राजकीय घडामोडीत सक्रिय असणारी अभिनेत्री कंगना रानौतने ट्विट करत या प्रकरणात उडी घेतली आहे. कंगनाने पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कंगना रानौत या प्रकरणावर ट्विट करत म्हणाली, मी पुन्हा एकदा योग्य सिद्ध झाले आहे. पूर्ण जग माझ्या विरुद्ध उभे राहिले आणि मला चुकीचे सिद्ध केले पण मी माझ्या शब्दांवर नेहमीच टिकून राहते आणि शेवटी विजय हा माझाच होतो. हाहा ….कोणालाही घमंड होईल यार.’ असे ट्विट करत कंगनाने केले आहे.

महत्वाच्या बातम्या