fbpx

डॉ. प्रितम मुंडे धावल्या अपघातग्रस्त महिलेच्या मदतीला

टीम महाराष्ट्र देशा : बीड लोकसभेच्या खा प्रीतम मुंडे यांनी अपघातग्रस्त महिलेच्या मदतीला धावत माणुसकीचे दर्शन घडवले आहे. लिंबोटीतील श्रमदान आटोपून सरफराजपूरकडे निघालेल्या प्रीतम मुंडे यांना रस्त्यावर एक महिला जखमी अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडल्याचे दिसले. मुंडे यांनी तत्काळ गाडीतून उतरत जखमी महिलेला पाणी पाजत रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.

लताबाई भोसले (रा.गव्हाणे कौडगाव ता. परळी) यांचा सरफराजपूर मार्गावर अपघात झाला होता, दुपारची वेल असल्याने रत्यावर वर्दळ देखील कमी होती. दरम्यान, येथून जात असलेल्या प्रीतम मुंडे यांना रस्त्याच्या कडेला एक महिला जखमी अवस्थेत पडल्याचे दिसताच त्यांनी गाडी थांबवली. प्रीतम यांनी जखमी महिलेला स्वतःहून पाणी प्यायला देत ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले.