डॉ.प्रमोद येवले यांना ‘पेटंट’ जाहीर,औषधी सेवन करण्याच्या पद्धतीबद्दल हे महत्वपूर्ण संशोधन

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मा कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांना औषधनिर्माणशास्त्र विषयातील संशोधनाबद्दल ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑफ इंडिया‘ यांच्यावतीने पेटंट जाहीर करण्यात आले आहे. औषधी सेवन करण्याच्या पद्धतीबद्दल हे महत्वपूर्ण संशोधन आहे.

या सदंर्भात इंटेलेक्युअल प्रॉपर्टी इंडिया यांचे पेटंट नियंत्रक यांनी ११ मार्च २०२० रोजी पेटंट नोंद करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. यानूसार ‘प्रोसेस फॉर प्रिपरेशन ऑफ इंट्रनसल इफाविटेन्झ नॅनो पार्टीकल्स फॉर सीएनएस टार्गेरिंग इन न्युरो एडस‘ या विषयापरील संशोधनास पेटंट म्हणून मान्यता दिली आहे. ७ डिसेंबर २०१६ रोजी नोंदविण्यात आलेले या पेटंटसचा अवघी आगामी वीस वर्षांसाठी असणार आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, डॉ.आरती व्ही.बेलगमवार व डॉ.शगुप्ता ए.खान या तिघांच्या नावाने सदर पेटंटस असणार आहे.

डॉ.येवले हे १६ जुलै २०१९ पासून कुलगुरुपदी कार्यरत आहेत. गेल्या आठ महिन्यात ‘एपीटीआय‘चा जीवन गौरव पुरस्कार तसेच महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘पेटंटस् ‘ प्राप्त झाल्या बद्दल कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांचे प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंश, डॉ.साधना पांडे, कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर, अध्यक्ष पर्वत कासुरे यांनी सत्कार केला.