fbpx

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या तीनही महिला डॉक्टरांचा जामीन अर्ज फेटाळला

टीम महाराष्ट्र देशा : डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीनही महिला डॉक्टरांचे जामीन अर्ज आज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत. रॅगिंग तसेच ऍट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रॅगिंगला कंटाळून वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर रुग्णालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉ. पायल तडवी या तरुणीने आत्महत्या केली होती. या आत्महत्याप्रकरणी नायर रुग्णालयातील आग्रीपाडा पोलिसांनी याच रुग्णालयातील डॉक्टर हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक केली होती.

तसेच त्यांच्यावर रॅगिंग आणि ऍट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तिघींनीही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीत असतानाच आपल्या वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.