डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार द्या, प्रस्ताव सादर करण्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश

मुंबई : कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठीचा प्रस्ताव राजशिष्टाचार विभागाकडे सादर करावा, असे निर्देश कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज कृषी विभागाला दिले.

याबाबत डॉ.बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. पंजाबराव देशमुख व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची कृषिविषयक कार्य आणि विचारांचा समावेश असलेली पुस्तिका तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश डॉ. बोंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत कृषी, राजशिष्टाचार विभाग आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते.