fbpx

उमेदवारी जाहीर नाही तरीही पद्मसिंह पाटलांनी घेतला उमेदवारी अर्ज

उस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माजी खा.पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र असे असतानाही पद्मसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा पद्मसिंह यांनाच उमेदवारी मिळणार, असे बोलले जात आहे.

उस्मानाबाद मतदारसंघात पाटील कुटुंबातील आ.राणाजगजितसिंह पाटील अथवा त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्याची चर्चा राष्ट्रवादीमध्ये सुरु आहे, तसेच बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या नावाचा देखील विचार केला जात आहे. अशातच पद्मसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शिवसेनेकडून विद्यमान खा.रवींद्र गायकवाड यांना पुन्हा एकदा उमेदवारी निश्चित मानली जात आहे, मात्र गायकवाड यांना बहुतांश शिवसेना नेत्यांकडून विरोध आहे. गायकवाड यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला आहे. सेनेतील इतर इच्छुकांनी मात्र पक्षप्रमुखांकडून निर्णय येण्याची वाट पहिली जात आहे.