डॉ. निलंगेकर यांचा निलंग्यात भव्य पुतळा उभा करण्याची;सर्वपक्षीय नेत्यांची एकमुखी मागणी

निलंगा/प्रदीप मुरमे : काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री डाॕ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना सर्वपक्षीय व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने बुधवारी सायंकाळी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.डाॕ.निलंगेकर यांचे ५ आॕगस्ट रोजी निधन झाले.मराठवाड्याच्या या थोर सुपूत्राला श्रध्दांजली वाहण्यासाठी येथील नक्षत्र मंगल कार्यालयात सर्वपक्षीय व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डाॕ.निलंगेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांकडून पुष्पहार अर्पण करुन भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

या शोकसभेत बोलताना वक्त्यांनी डाॕ.निलंगेकर यांच्या अनेक आठवणी जागविल्या.डाॕ.निलंगेकर हे जेष्ठ नेते होते.त्यांच्या जाण्याने पक्षाबरोबरोबरच मराठवाड्याचे फार मोठे नुकसान झाले आहे.मराठवाड्याबरोबरच राज्याच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे.त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे निलंगा मतदार संघाचा सर्वांगिण विकास झाल्याच्या भावना या शोकसभेत व्यक्त केल्या गेल्या.डाॕ.निलंगेकर यांचे विचार व कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्यामुळे डाॕ.निलंगेकर यांचा शहरात पुतळा उभा करण्याची सर्वपक्षीय मागणी या शोकसभेत करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, शेतकरी कामगार पक्षाचे अॕड,नारायण सोमवंशी,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ईस्माईल लदाफ, रिपाइंचे प्रदेश सचिव विलास सुर्यवंशी,काँग्रेसचे नेते अभय साळुंके, प्रा. दयानंद चोपणे,गोविंद शिंगाडे,प्रा.गजेंद्र तरंगे, भाजपचे इरफान सय्यद,सावता परिषदचे शरद पेठकर, मराठा सेवा संघाचे एम. एम.जाधव,विनोद सोनवणे,डॉक्टर असोसिएशनचे डॉ.लालासाहेब देशमुख,डॉ.किरण बाहेती,डॉ. उद्धव जाधव, पत्रकार संघाचे अध्यक्ष राम काळगे,सचिव झटिंग म्हेत्रे,वकील मंडळाचे अध्यक्ष अॕड. तिरुपती शिंदे,आडत व्यापारी संघटनेचे अनिल अग्रवाल,टिपूसुलतान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर,सबदर काद्री,वंचितचे देवदत्त सूर्यवंशी,बौद्ध महासभेचे प्रा.रोहित बनसोडे,लोक लढा संघटनेचे मोहन क्षीरसागर, समाजसेवक नसीमोद्दीन खतीब, लहुजी शक्ती सेनेचे गोविंद सुर्यवंशी आदींनी या शोकसभेत आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख ईश्वर पाटील,पालिका सभापती भगवान कांबळे,नगरसेवक विष्णू ढेरे, शफीक सौदागर, युवा सेनेचे दत्ता मोहळकर,राणा आर्य, उमेश सातपुते,एमआयएमचे तालुकाध्यक्ष सय्यद शाहरुख, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी, माजी नगरसेवक भास्कर धानोरकर, असगर अन्सारी अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष लाला पटेल, माजी नगरसेवक अशोक शेटकार, अमित नितनवरे, विजयकुमार सुर्यवंशी,शेख जाकेर,मगदूम पटेल,विजय होगले यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी,व्यापारी, डॉक्टर्स व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी दोन मिनिट स्तब्ध राहून आदरणीय दादासाहेबांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

‘पॉझिटिव्ह’च्या संपर्कात आला असाल तर स्वत: विलगीकरणात जा; महापौर संदीप जोशी यांचे आवाहन

अत्यावश्यक कामाखेरीज म.न.पा. मध्ये येण्याचे टाळा, तुकाराम मुंढे यांचे आवाहन

भाजपच्या ढाण्या वाघाने कोरोनाला दिला धोबीपछाड