महिलांची गर्भाशय काढून टाकल्याचे प्रकरण, डॉ. नीलम गोऱ्हे बीडच्या दौऱ्यावर

बीड : बीड जिल्ह्यात अनेक महिलांची गर्भाशय काढून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे, या पार्श्वभूमीवर राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आज सायंकाळी बीड जिल्ह्यातल्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयास भेट देणार आहेत.

गोऱ्हे अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली असून त्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बीड इथं एक बैठकही घेणार आहेत. त्याचबरोबर वंजारवाडी इथल्या पीडित महिलांशी तसंच आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांशी त्या संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात त्या साखर कारखाना संचालक, मुकादम संघटना प्रतिनिधी तसंच अशासकीय संस्थाच्या प्रतिनिधींबरोबरही चर्चा करणार आहेत.