वीरेंद्र तावडेचा जामीन अर्ज फेटाळला: तावडे डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणातील आरोपी

पुणे: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेचा जामीन अर्ज पुण्यातील न्यायालयाने फेटाळून लावला. आता याप्रकरणाची सुनावणी २४ ऑक्टोबरला होणारेदोन अज्ञात व्यक्तींनी २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केली होती. या हत्या प्रकरणात तीन वर्षानंतर २०१६ मध्ये वीरेंद्र तावडेला मुंबईत अटक करण्यात आली होती.

सनातनचा साधक असणाऱ्या वीरेंद्र तावडे याने कट रचून विनय पवार आणि सारंग अकोलकर आणि इतरांच्या मदतीने दाभोलकरांची हत्या केल्याचे आरोपपत्र सीबीआयने दाखल केले होते. दरम्यान अनेक महिन्यांपासून आरोप निश्चिोती होत नसल्याने तावडेला जामीन मिळण्यासाठी शिवाजीनगर सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

 

You might also like
Comments
Loading...