डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिन; अनिस करणार विचारांचा जागर

पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत. पाचव्या स्मृतिदिनी विचारांचा जागर करण्यात येणार आहे. पुण्यातील साने गुरुजी स्मारक येथील कार्यक्रमात अभिनेते प्रकाश राज आणि दिग्दर्शक अमोल पालेकर सहभागी होणार आहेत. सकाळी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गीतांमधून अभिवादन करण्यात येईल.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही त्यांच्या हत्येमागील सूत्रधार अद्याप मोकाटच आहेत. याचा निषेध नोंदवण्यासाठी आज पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पूल, लक्ष्मी रोड, अलका चौक, दांडेकर पूल, साने गुरुजी स्मारक या मार्गावर ‘अंनिस’ ‘जवाब दो’ रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीमध्ये हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांच्यासह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, बाबा आढाव, लक्ष्मीकांत देशमुख, मेधा पानसरे आदी सहभागी झाले.

महाराष्ट्रातून 81 डॉक्टर्सची टीम केरळला रवाना