fbpx

प्रवीणने प्रमोद महाजनांना गोळ्या का मारल्या हे सांगायला दोन मिनिटं लागणार नाही – आव्हाड

प्रवीणने प्रमोद महाजनांना गोळ्या का मारल्या हे सांगायला दोन मिनिटं लागणार नाही - आव्हाड

टीम महाराष्ट्र देशा : प्रवीण महाजनने प्रमोद महाजनांना गोळ्या का मारल्या? याचे अंतर्गत जे काही कांगोरे आहेत, ते काही जणांना माहित आहेत. त्यापैकी मी एक आहे. आमच्या बापाला बोलाल, तर खबरदार. मर्यादा सोडायला दोन मिनिटंही लागणार”, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांना प्रत्युत्तर दिले आहे.

“प्रवीण महाजनने प्रमोद महाजनांना गोळ्या का मारल्या? याचे अंतर्गत जे काही कांगोरे आहेत, ते काही जणांना माहित आहेत. त्यापैकी मी एक आहे. आमच्या बापाला बोलाल, तर खबरदार. मर्यादा सोडायला दोन मिनिटंही लागणार नाहीत. पण दोघांचेही संबंध होते, त्याची तरी आपल्याला आठवण यायला हवी होती.” असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले.

दरम्यान, तुम्ही दाखवत असाल की, सगळ्यांचे ऐकत आहात. मात्र, शकुनी मामा सारखं सगळ्या ठिकाणी नाक लावून  महाभारत सुरु केलं, असे आपण शरद पवार आहात. अशी महागठबंधनची गोष्ट आहे. बघितलं ना, शकुनी मामा कसा असतो? स्वत:ला मिळालं नाही ना, तर इकडचं तिकडे आणि तकडचं इकडे. मंथरा असो शकुनी मामा असो, हे महागठबंधनचे चेहरे आहेत.” असे खासदार पूनम महाजन म्हणाल्या होत्या.