पद्मविभूषण जयंत नारळीकर

jayant narlikar birthday special artical

वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिलेला आपला भारत देश. अगदी इसवी सनाच्या पूर्वी देखील भारतीय शास्त्रज्ञांनी विज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. हि कामगिरी म्हणजे भारतभूमीच्या शिरपेचातील मानाचा तुराच. हि समृद्ध वैज्ञानिक परंपरा आजही काही विज्ञानश्रेष्ठींनी पुढे चालू ठेवली आहे. आणि त्यात आजच्या घडीला सर्वोच्च स्थानी ज्यांचं नाव अभिमानाने घेतलं जातं ते म्हणजे डॉ. जयंत विष्णू नारळीकर.

Loading...

  jayant narlikar birthday special articalडॉ. जयंत नारळीकरांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील वाराणसीतील एका महाविद्यालयात गणित विभागाचे प्रमुख होते. त्यामुळे जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसीतच झाले. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली. खगोलशास्त्रया विषयात विशेष रस असणाऱ्या नारळीकरांनी या विषयाचा सखोल अभ्यास केला. उच्च शिक्षणासाठी ते केंब्रिज येथे गेले. तिथेच त्यांनी पीएचडी मिळवली. तिथेही त्यांच्या अभ्यासकार्याचा गौरव झाला. तिथे त्यांना रँग्लरहि पदवी मिळाली. तसेच खगोलशास्त्रातील टायसन मेडलहे बक्षीसही त्यांनी मिळवले. पुढे भारतात परतल्यावर त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्याखगोलशास्त्र विभागप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. पुण्यातील आयुकासंस्थेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. आपल्या सखोल अभ्यासातून त्यांनी स्थिर स्थिती सिद्धांतमांडला. सुमारे चार दशकांहून अधिक काळ त्यांचे संशोधनकार्य चालू आहे.

आपल्या या ज्ञानाचा दिवा जगभर पेटवण्यासाठी त्यांनी  लिखाण देखील केले. अनेक मराठी नियतकालिकांमधून त्यांचे विज्ञानविषयक ललितलेख सतत प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या अनेक पुस्तकांचे जगभरात विविध भाषांत भाषांतर झाले आहे. हा एकप्रकारे मराठी साहित्याचा सन्मानच आहे. त्यांनी लिहिलेल्या यक्षांची देणगीया पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. चार नगरांतले माझे विश्व‘  या त्यांच्या आत्मचरित्राचा २०१४ साली साहित्य पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यांच्या या अद्वितीय कार्याची दखल भारत सरकारनेही घेतली. १९६५ साली त्यांना पद्मभूषणतर २००४ साली पद्मविभूषणपुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांचा हा गौरव म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनया मूल्याचाच गौरव होता.  

त्यांच्या कार्यामुळे वैज्ञानिक क्षेत्रात भारत आज एका नवीन उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे.अशा या महान खगोलशास्त्रज्ञाचा संपूर्ण भारतवासीयांना प्रचंड अभिमान आहे. अशी विज्ञानाची अखंड तपश्चर्या करत असलेल्या या महान शास्त्रज्ञास सलाम! तसेच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

 

 लेखक

अपूर्व कुलकर्णी

 

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात