मुंबई: कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) ही त्यांच्या कीर्तनामुळे त्याच सोबत वादग्रस्त वकतव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा त्यांनी करोनाची तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याच सोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
इंदूरीकर महाराजांच्या त्या वक्तव्यावर डॉ. हमीद दाभोलकर (Dr. Hameed Dabholkar) म्हणाले, इंदुरीकर महाराज यांनी ‘माळा काढणाऱ्यांसाठीच तिसरी लाट असणार आहे’ अशा स्वरुपाचं वक्तव्य केलं आहे. माझ्यामते ते अशास्त्रीय विधान आहे. करोना कशामुळे होतो आणि तो टाळण्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी शासन आपल्याला परत परत वेगवेगळ्या माध्यमातून माहिती देत आहे, असं डॉ. दाभोलकर यावेळी म्हणाले आहेत.
पुढे बोलताना डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, करोनाविषयी असे गैरसमज पसरवणं आणि ते देखील वारकरी संप्रदायाच्या नावावरती हे चुकीचं आहे. तुकाराम महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी आपल्याला कार्यकारणभाव सांगितला होता. ‘नवसा सायासे कन्यापुत्र होती, तर का करणे लागे पती’, असं जी वारकरी परंपरा सांगते तिच्या नावावर अशाप्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणे ही चुकीची गोष्ट आहे, असं वक्तव्यं करत नाराजी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘कामावर रुजू झाल्यास कारवाई मागे घेणार का?’; एसटीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले…
- सरसकट मालमत्ता कर माफ करा; आशिष शेलारांची स्वाक्षरी मोहीम
- ‘…आताही तीच परिस्थिती शिवसेनेची होणार’; निवडणुकांवरून प्रविण दरेकरांचे वक्तव्यं
- मुंबईत ओमायक्रॉनची लाट? टास्क फोर्स म्हणते…
- काँग्रेस सदस्य नोंदणी अभियान मोठी चळवळ म्हणून उभी करा; काँग्रेस सरचिटणीस ओझांचे आवाहन..!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<