डॉ. धनराज माने यांच्यावर निलंबनाची कारवाई करता येणार नाही-तावडे

Vinod_Tawde

पुणे – राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप निश्चित होऊन देखील त्या अधिकाऱ्याला तावडे यांनी पाठीशी घालत आहेत कि काय? अशी विचारण्याची वेळ आली आहे कारण सभागृहातील आमदारांनी केलेल्या आरोपांचा रोष आणि गोंधळ पाहून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले होते मात्र, समितीद्वारे डॉ. माने यांची चौकशी केल्यानंतर ते दोषी नसल्याची माहिती पुढे आल्याने त्यांच्या निलंबनाची कारवाई करता येणार नाही,’ अशी धक्कादायक माहिती राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी रविवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये २०१२ सालामध्ये झालेल्या प्रपाठक, अधिव्याख्याता, वर्ग तीन पदांवर नियमबाह्य व चुकीच्या नियुक्त्या झाल्याचा ठपका डॉ. माने यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी डॉ. व्हि. एस. मोरे यांच्यासह एकूण तीन सदस्यीय समिती करत होती. डॉ. मोरे यांनी संबंधित प्रकरणाचा अहवाल देखील तयार करून त्यांनी उच्च शिक्षण विभाग आणि तावडे यांच्याकडे पाठविला होता. त्यात ते दोषी आढळले होते, त्यानुसार या प्रकरणात डॉ. माने यांना निलंबित करून त्यांची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा तावडे यांनी सहा एप्रिल रोजी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली.

Loading...

डॉ. माने यांच्या काळात विद्यापीठात भ्रष्टाचाराचे प्रकरण झाले नाही. तसेच, डॉ. माने हे प्रत्यक्ष त्या प्रकरणात सहभागी नव्हते, अशी माहिती साडेचार हजार पानांच्या अहवालातून समोर आली. त्यामुळेच निलंबनाच्या आदेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली नाही. एकिकडे निलंबनाची घोषणेची कार्यवाही करत आलो तर दुसरीकडे समितीच्या अहवालाचा अभ्यास करण्यात येत होता. त्यामुळेच योग्य निर्णय घेण्यासाठी कालावधी लागला, असे तावडे यांनी सांगून डॉ. माने यांची पाठराखण केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले