डॉ. दाभोलकरांच्या नावे दिला जाणार पुरस्कार रहित करण्याची मागणी

सातारा  : सातारा नगरपालिकेच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नावे देण्यात येणारा स्मृती पुरस्कार रहित करण्यात यावा, यासाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने नगराध्यक्षा माधवी कदम यांची भेट घेण्यात आली. या विषयीचे निवेदन नगराध्यक्षा माधवी कदम यांना आणि मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या नावे प्रसाशकीय अधिकारी राजेश काळे यांना देण्यात आले.

”हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी उपस्थित केलेले मुद्दे पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत मांडण्यात येतील. डॉ. दाभोलकर आणि त्यांच्या न्यासावर झालेल्या आरोपांचा विचार करून मगच पुरस्काराविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईस,”असे कदम यांनी सांगितले.