डॉ. दाभोळकरांची हत्या करणारा मास्टर माईंड शोधावा : डॉ. हमीद दाभोळकर

टीम महाराष्ट्र देशा – डॉ. नरेंद्र दाभोळकरांवर गोळ्या झाडणाऱ्या सचिन अंदुरे याला सीबीआयने अटक केली आहे. दाभोळकरांच्या हत्येनंतर पाच वर्षांनी मारेकऱ्यांना अटक करण्यात यश आले आहे. आता एटीएस आणि सीबीआय यांनी मास्टर माईंड शोधून मेंदूपर्यंत जावे असे डॉ. हमीद दाभोलकर यांनी म्हटले आहे.

दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. अडीच वर्षांपूर्वी तावडेला अटक केली होती. त्यानंतर सीबीआयने औरंगाबादमधून सचिन अणदुरेला अटक केली हे एक सकारात्मक पाऊल आहे. आता सीबीआयने लवकरच या कटाच्या पाठीमागे नेमकं कोण आहे? याचा मास्टर माईंड शोधावा आणि त्याच्या मुळाशी जाऊन सर्व पाळेमुळे शोधून काढावीत अशी मागणी डॉ. हमीद दाभोलकर यांनी केली आहे.

https://maharashtradesha.com/underworld-don-dawood-ibrahim-on-jabir-moti/

षटकार ठोकून ऋषभ पंतचे कसोटी पदार्पण