भिडे गुरुजींच्या वक्तव्यामुळे अन्यायग्रस्तांची क्रूर चेष्टा झाली – डॉ. भारत पाटणकर

टीम महाराष्ट्र देशा: देवाने, संतांनी कधीही जातीपातीला थारा दिला नाही. मात्र, सद्यःस्थितीत त्याउलट कारभार सुरू असून, देवाला वंदन करतानाही जातीभेद केला जातो, असा दावा करत यापूर्वीच्या सरकारसह आत्ताच्या सरकारसोबत यासाठी लढा सुरू आहे. मात्र, पत्रव्यवहाराची भाषा सरकारला समजत नाही. त्यामुळे आता आंदोलन करून विशिष्ट लोकांमधून देवाला मुक्त केले जाणार आहे. त्यासाठीच कोल्हापूरमध्ये राज्यव्यापी बैठक घेऊन गणमाता अंबाबाई मुक्ती आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याची सांगत मनोहर भिडे गुरुजींनी अट्रॉसिटीबाबत चुकीचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे अन्यायग्रस्तांची क्रूर चेष्टा झाली आहे. त्यामुळेच त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केली आहे.

सावरघर (ता. पाटण) येथील श्रमिक मुक्ती दलाचे 21 व्या अधिवेशनावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष वाहरू सोनावने, संपत देसाई, डॉ. प्रशांत पन्हाळकर, सुभेदार मेजर बन यावेळी उपस्थित होते.