fbpx

माणुसकीचा संदेश देणारी भीमजयंती पुण्यात उत्साहात साजरी

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२८ वी जयंती. आज जगभरात मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली जाते. माणुसकीचा संदेश देणारी भीमजयंती पुण्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, विविध कार्यक्रम आयोजित करून, महामानवाला अभिवादन करण्यात येते. बाबासाहेबांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि नेमक्या याच माणुसकीचा प्रत्यय आज पुण्यात साजर्या करण्यात आलेल्या भीमजयंतीमध्ये आला. ‘महामानवांचे विचार आचरणात आणणे हीच खर्या अर्थाने त्यांची जयंती साजरी करणे आहे’ असा संदेश यामधून समाजाला देण्यात आला.

पुस्तक अर्पण करून अनोखे अभिवादन करण्याचा संदेश

पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल. ज्ञानाच्या जोरावर महापुरुषांना महानता प्राप्त झाली आहे.  आणि त्यात पुस्तकांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे हार, फुलं, मेणबत्ती, अगरबत्ती अर्पण करण्याऐवजी पुस्तक अर्पण करून अनोखे अभिवादन करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

मेणबत्ती, फुलांऐवजी अर्पण करण्यात आलेली पुस्तके –

पुण्यातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने त्यांचे अनुयायी उपस्थित होते. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली होती. ठिकठिकाणी थंड पाणी, थंड पेय, लाडू, वाटप, तसेच अन्नदान देखील करण्यात आले.

थंड पाण्याचे वाटप करून नागरिकांची तहान भागवणारे युवक –

भर उन्हात कोकम सरबताचे वाटप करणाऱ्या महिला –

बाबासाहेबांचे विचार, त्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहचावेत यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता करण्यात आली. तेथे आलेल्या नागरिकांनी देखील याला उत्तमरीत्या प्रतिसाद दिला.