‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेचं अंगावर काटा आणणारंं गाणंं तुम्ही ऐकलत का ?

पुणे : छोट्या पडद्यावर लवकरच महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एक मालिका सुरु होत आहे.18 मे पासून सुरु होणाऱ्या या मालिकेची सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणावर चर्चा देखील सुरु आहे.

गायक आदर्श शिंदेचा रांगडा आवाज आणि उत्कर्ष शिंदे यांनी लिहलेलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेचं टायटल सॉंग लवकरच रिलीज होत आहे. आदर्शच्या आवाजात नुकतंच या गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केला असून हे गाणे ऐकल्यावर अक्षरशः अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

दरम्यान,18 मे पासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता या मालिकेतून बाबासाहेबांचा जीवनपट दाखविण्यात येणार आहे.