डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पुतळा वादात शिवसेनेची उडी

Marathwada-University

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून सुरू असलेल्या वादात आता शिवसेनेनं उडी घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत पुतळा बसवावा यासाठी शिवसेनेने काल कुलगुरुंची भेट घेतली.

Loading...

छत्रपतींचा पुतळा उभारण्यावरून सध्या औरंगाबाद मध्ये वातावरण तापले आहे. काल शिवसेनेचं शिष्टमंडळ कुलगुरूंना भेटले परंतु प्राधिकरणाच्या निवडणुका झाल्यानंतरच पुतळ्याचा प्रश्न निकालात काढू असे आश्वासन कुलगुरू डॉ. बी.ए चोपडे यांनी काल शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा विद्यापीठात बसण्याचा ठराव पारित झाला आहे परंतु काही संघटनांच्या दबावाला बळी पडून कुलगुरू पुतळा बसण्यास टाळाटाळ करत आहेत असा आरोप खा. चंद्रकांत खैरे यांनी केला आहे, खा. खैरे आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेतली होती यावेळी पुतळा लवकरात लवकर बसवण्यात यावा असे निवेदन कुलगुरूंना देण्यात आले.

अर्थसंकल्पात चाळीस लाख रुपयांची तरतूद झाली असताना छत्रपतींचा पुतळा का उभारण्यात आला नाही असा सवाल कुलगुरूंना यावेळी शिवसैनिकांनी केला, यावर कुलगुरू म्हणाले की निवडणूक होत असल्याने सर्व प्राधिकरण बरखास्त केलेले आहेत, त्यामुळे सध्या तरी पुतळा उभारता येणे शक्य नाही पण निवडणुका नंतर उभारण्यात येईल, यानंतर शिवसैनिकांनी कुलगुरूंचे जो पर्यंत ठोस उत्तर येत नाही तोपर्यंत आम्ही दालनातून जाणार नाही असा पवित्रा घेतला.

कुलगुरूंचा जो निर्णय असेल तो त्यांनी लवकरात लवकर आम्हाला सांगावा, कुलगुरूंना ठराव मंजूर नसेल तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवाईनीकांनी दिला कुलगुरू उत्तर देणार नसतील तर त्यांची राज्यपालांकडे तक्रार करण्यात यावी अशी भूमिका शिवसैनिकांनी बोलून दाखवली, यावेळी सेनेच्या शिष्टमंडळात आ.विनोद घोसाळकर, नरेंद्र त्रिवेदी, विनायक पांडे, पूनम सोलापुरे, अंकुश रंदे, विजू वाघमारे, विनायक पांडे आदींचा समावेश होताLoading…


Loading…

Loading...