अघोरी विद्येसाठी केला उपकुलसचिव मंझाने उद्योग

dr babasaheb ambedkar marathwada university news

अभय निकाळजे (वरिष्ठ पत्रकार) औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काय होईल, हे सांगता येत नाही. आता उपकुलसचिव पदावरील ईश्वर मंझांना नौकरीला लावुन देतो, म्हणून फसवणूक करून 27 लाख रूपयांना लुबडल्या प्रकरणी अटक केली आहे. वास्तविक विद्यापीठातील उपकुलसचिवपदावरील कुणालाही नौकरीलाच काय पण कंत्राटी कामावरही घेऊ शकत नाही. मग काय आहे खरा प्रकरण?
तर सगळे व्यवस्थित झाल्यानंतर म्हणजे निलंबित ईश्वर मंझांना पुन्हा नौकरीवर घेतल्यावर विद्यापीठातील ज्या ‘विद्यार्थी नेत्याने’ त्यांनी निलंबित करण्यासाठी खटाटोप केला. त्याच विद्यार्थी नेत्याने ही ‘पोलिस केस’ तक्रारीत ‘फिट्ट’ बसविण्याचा घाट घातला. मिळालेल्या माहीतीनुसार या पुर्वी पोलिसांना जी तक्रार ईश्वर मंझांच्याविरोधात दिली होती. त्यामध्ये तक्रार करणाऱ्यांने त्यांना 27 लाख रूपये उधारीत दिले होते. ज्याने ते पैसे दिले, त्याला उपकुलसचिवपद खुप मोठे आणि भरघोस पगाराची वाटली, म्हणून त्याने पैसे देतांना फारसा विचार केला नाही. त्याच काळात मंझाचे गुण वाढ प्रकरण त्या विद्यार्थी नेत्याने बाहेर काढले होते. त्या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने निलंबित केले. त्याच्या चौकशी समितीचा अहवाल मंझाने ‘मॅनेज’ केला. पण ‘त्या’ विद्यार्थी नेत्याच्या हट्टापायी मंझांना पुन्हा विद्यापीठात ‘एन्ट्री’ मिळत नव्हती. ती ‘एन्ट्री’ मंझाने ‘मॅनेज’ केली. थोडक्यात हा प्रकार त्या विद्यार्थी नेत्याला चेक देण्यासारखा वाटला. पण त्या हुशार विद्यार्थी नेत्याने शक्कल लढविली अन् मंझाच्या विरोधातली तक्रार फिरवली आणि त्या विद्यार्थी नेत्याने त्या तक्रारदाराला गाठले. त्याला ती तक्रार गून्ह्याच्या स्वरूपात ‘फिट्ट’ बसविण्यासाठी नोकरीच्या अमिषाचे कारण पुढे केले गेले. पोलिसांनी उपकुलसचिव दर्जाच्या अधिकाऱ्या कुणाला नोकरीला लावण्याचे अधिकार आहेत किंवा नाहीत, याची शहनिशा करणे गरजेचे होते. पण तसे न करता त्या विद्यार्थी नेत्याच्या दबावाला पोलिस बळी पडले आणि प्रसार माध्यमांनाही दिवसभर चालवायला बातमी मिळाली. ही केस कोर्टात ‘स्टॅण्ड’ होत नाही. याचा अंदाज विद्यापीठात असणाऱ्या ‘मंझा (हितचिंतक) परीवाराला’ही आहे. पण विद्यापीठात जे प्रशासकीय राजकारण सुरू आहे, त्यातुन हा सगळा  प्रकार घडला.

आता मुळ प्रश्न 27 लाख आणि अघोरी विद्या

Loading...

विद्यापीठात मंझा परिवार आहे. एक दोन नाही तब्बल तीन जण आहेत. जे विद्यापीठाच्या प्रशासकीय राजकारणात ‘सख्खे’ असुनही एकमेकांच्यासमोर आहेत. या समोर आलेल्या आपल्यांना आणि त्रास देणाऱ्या विद्यार्थी नेत्याला चेक देण्यासाठी मंझा अघोरी विद्येच्या मागे लागले. त्या विद्येच्या माध्यमातुन आपला त्रास स्वकियांचा आणि परकियांचा दुर होईल, असे वाटले होते. त्यासाठी त्यांनी पैसे घेतले पण झाले काही वेगळेच. ही आहे ‘रियल मंझा स्टोरी’ .

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात