गोंधळलेले कुलगुरू डॉ. बी.ए.चोपडे यांच्या वादग्रस्त कारकीर्दीचा पंचनामा

kulguru b.a.chopade

शाम पाटील ,औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी;डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना सन 1958 साली झाली विद्यापीठ कायद्यानुसार 60 कॉलेज असणं अनिवार्य होत परंतु त्यावेळी केवळ आठच कॉलेज मराठवाडा विभागात होती तरीसुध्दा तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने मराठवाडा विद्यापीठ स्थापन झाले, विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात वादग्रस्त सध्याचे कुलगुरू डॉ बी.ए चोपडे हे ठरत आहेत .मराठवाडा विद्यापीठ महापुरुषांच्या नावावरून दुसऱ्यांदा वादग्रस्त ठरले आहे एकदा नामांतराच्या वेळी तर आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून विद्यापीठाच्या अब्रूची लक्तरे अक्षरशः वेशीवर टांगली गेली आहेत . डॉ. बी. ए चोपडे यांच्या कारकिर्दीत विद्यापीठाचा कारभार काही केल्या सुरळीत चालत नाही त्यांचे वादग्रस्त निर्णय आणि आतापर्यंतच्या वाटचालीचा घेतलेला आम्ही आढावा …

कुलगुरूंचा आतापर्यंत एकही निर्णय घटनात्मक पद्धतीने नाही

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ बी. ए चोपडे यांची विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून 4 जुलै 2014 रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यापूर्वी डॉ. चोपडे पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम पाहत होते. डॉ विजय पंढरीपांडे विद्यापीठाचे कुलगुरू असताना तत्कालीन अधिकार मंडळाने जालना आणि बीड येथे विद्यापीठ सेंटर असावेत असा विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला होता, ते काम अस्तित्वात येण्याअगोदरच डॉ चोपडे यांची कुलगुरू पदी नियुक्ती झाली व या निर्णयासंबंधी काही संघटनांनी आंदोलन सुरू केले व निर्णय मागे घेण्याची मागणी केली, डॉ. चोपडे यांनी तो निर्णय मागे घेतला व विद्यार्थी हिताला केवळ काही संघटनांच्या दबावाला बळी पडून फाटा दिला,हा निर्णय घेण्याचे अधिकार जरी कुलगुरूंना असले तरी त्यासाठी असलेली प्रक्रिया म्हणजे जर कुलगुरूंना वाटले हा एखादा निर्णय विद्यार्थ्यांचा हिताचा नाही तर कुलगुरू तो राज्यपालाला कळवतात व त्यावर राज्यपालांची परवानगी आल्याशिवाय तो रद्द करता येत नाही परंतु हा निर्णय कुलगुरूंनी राज्यपाल कार्यालयाला न कळताच हा निर्णय घेतला.

 एकाच वर्षात तीन संचालक बदलले
कुलगुरूंनी पदभार स्वीकारण्या आगोदार वित्त व लेखा अधिकारी, परीक्षा नियंत्रक,संचालक विद्यापीठ व महाविद्यालय ( BCUD ) ही तीन पद रिक्त होती, ही पद कुलगुरूंनी विद्यापीठ नियमानुसार भरायला हवी होती. कुलगुरू या ती पदांपैकी फक्त संचालक विद्यापीठ व महाविद्यालय यांचीच नियुक्ती करू शकतात ती त्यांनी केली पण आणि लगेच संचालकांचा राजीनामा पण घेतला, त्याच्यानंतर पुढे एकाच वर्षात तीन संचालक बदलले गेले.

एकाच वर्षात 14 कुलसचिव
परीक्षा नियंत्रक आणि वित्त व लेखा अधिकारी यांच्या जागा जाहिरात देऊन भरायला हव्या होत्या परंतु त्याच्या साठी ना जागा भरल्या त्या जागी प्रभारी अधिकाऱ्यांची नेमणूक कुलगुरू महाशयांनी केली, त्यानंतर हे अधिकारी सुद्धा एकाच वर्षात चार वेळा बदलले आणि परीक्षा नियंत्रक देखील सात वेळा एकाच वर्षात बदलले गेले.पुढे डॉ. डी. आर माने कुलसचिव होते परंतु त्यांची नियुक्ती राज्याचे शिक्षण संचालक म्हणून झाल्यानंतर ते पद रिक्त झाले असता या पदासाठी जाहिरात देऊन पद भरण्यात यायला हवे होते म्हणून जाहिरात देऊन अर्ज मागवले, अर्जदाराच्या मुलाखती घेतल्या मात्र विद्यापीठ कायद्यात कुठेही लेखी नियम नसताना देखील त्या उमद्वारांच्या कुलसचिव पदासाठी परीक्षा घेतली गेली व निकाल लागल्यानंतर परीक्षा देणारा पैकी एकही कुलसचिव या पदासाठी पात्र नाही असे कुलगुरू यांनी सांगितले. सध्याचे विद्यमान कुलसचिव डॉ. जब्दे हे त्याच पात्र नसलेल्या लोकांपैकी एक आहेत जब्दे यांची नियुक्ती जाहिरात न देताच थेट केली गेली, ही नियुक्ती विद्यापीठ नियमानुसार न केल्यामूळ शिक्षण संचालक कार्यालय औरंगाबाद यांनी त्यांचा पगार देण्यास स्पष्ट नकार दिला आता त्यांचा पगार विद्यापीठ फंडातून केला जातो म्हणजे त्याचा बोजा विद्यापीठावरच येतो, डॉ. जब्दे यांची नियुक्ती होण्याअगोदर एकाच वर्षात 13 कुलसचिव बदलले गेले जब्दे हे 14 वे कुलसचिव आहेत

पोस्ट ग्रॅज्युएशन प्रवेश गोंधळ.
विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित सुरू असताना कुलगुरूंनी केवळ V Shine software कंपनीला फायदा व्हावा म्हणून पदव्युत्तर परीक्षा ऑनलाईन घेण्याचे ठरवले, पुन्हा त्यात विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या तक्रारी येऊ लागल्याने त्या नियमात पुन्हा बदल करून परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरवले आणि ही प्रवेश प्रक्रिया सपशेल निरूपयोगी ठरली . सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठात स्पॉट ऍडमिशन घेण्यासाठी बोलावले याची विद्यापीठ प्रशासनाने कुठलीही पूर्व तयारी केली नाही म्हणून विद्यापीठात गोंधळ उडाला काही विद्यार्थ्यांनी रसायन शास्त्र विभागावर दगडफेक सुध्दा केली आणि प्रक्रिया पुन्हा बारगळली. कुलगुरूंनी परत निर्णय बदलून प्रत्येक कॉलेज ने आपल्या आपल्या स्तरावर प्रवेश करून घ्यावा असा फेरनिर्णय घेतला. साधारणतः ही प्रवेश प्रक्रिया जुलै च्या पहिल्या आठवड्यात पूर्ण व्हायला हवी होती परंतु अजूनही सुरूच आहे, काही विद्यार्थ्यांचे अजून ऍडमिशन ही झाले नाही व सेमिस्टर च्या परीक्षा येऊन ठेपल्या आहेत.

पेट परीक्षा.
Phd साठी UGC च्या नियमानुसार पेट परीक्षा अनिवार्य केलेली आहे, पण त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असावी असे UGC ने कुठेही म्हटले नाही परंतु कुलगुरू महाशयांनी असा नियम नसतांना देखील अचानक निगेटिव्ह मार्किंग पद्धतीने परीक्षा घेतली ही परीक्षा निगेटिव्ह मार्किंग पद्धतीने आहे असा मॅसेज विद्यार्थ्यांना मिळाला नसल्या कारणाने त्याचा परिणाम म्हणून पेट परीक्षेचा निर्णय फक्त तीन टक्के लागला 15 हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ 350 च्या आसपास विद्यार्थी पास झाले, यामुळे नापास विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्याने निगेटिव्ह मार्किंग पद्धत रद्द करून पेपरची पुनर्तपासणी सुरू केली त्यांनतर जवळपास बाराशे विद्यार्थी पास झाले.

बदल्यांचा गोंधळ
शिपाई ते परीक्षा नियंत्रक परीक्षा विभागातल्या शंभर टक्के बदल्या एकाच दिवसात कुलगुरू महाशयांनी केल्या यात काही टेक्निकल काम सांभाळणारे लोक सुध्दा होते त्यांची तिथं आवश्यकता असते परंतु एकदमच संपूर्ण विभागातील अधिकारी बदलल्याने नवीन लोकांचा काम करताना गोंधळ होऊ लागला त्यामुळे त्यांना जुन्या लोकांची मदत घ्यायला सांगितले आशा प्रकारे एकाच खुर्चीवर दोन लोक काम पाहू लागले.यामुळे ज्या विभागातील लोक या विभागात नेमले गेले त्या विभागात देखील गोंधळ उडायला सुरुवात झाली शासनाच्या नियमानुसार 30% पेक्षा जास्त बदल्या एका विभागातून एकाच वर्षात करता येत नाहीत परंतु कुलगुरूंनी 100% टक्के बदल्या एकाच विभागातून एकाच वेळी केल्या

कॅरिओन आंदोलन
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सुपर कॅरीऑन मिळावा म्हणून विद्यापीठात आंदोलन केले विद्यापीठात केवळ 25 टक्केच ATKT साठी असतात परंतु विद्यार्थ्यांची सुपर कॅरीऑन ची मागणी मान्य न करता 50 टक्के ATKT एवढा बदल विद्यापीठ नियमांचे पालन न करताच केला गेला या मध्ये आठ दिवसात आठ वेगवेगळे बदल करण्यात आले व विद्यार्थ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.

हे सर्व सुरु असतानाच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद आणि संजय शिंदे यांचे निलंबन एका संघटनेच्या दबावाखाली येऊन केले आहे .या सगळ्या विषयांसंदर्भात महाराष्ट्र देशाने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील केला मात्र कुलगुरूंशी संपर्क होऊ शकला नाही . कुलगुरू म्हणून सपशेल अपयशी ठरलेले डॉ. बी.ए चोपडे यांच्या मुळे कुलगुरू नियुक्तीच्या नियमातच बदल करावे लागतात की काय आशी एकूणच परिस्थिती निर्माण झालेली आहे