fbpx

वरुड : अनिल बोंडेंंना मंत्रिपद मिळताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत केला जल्लोष

अमरावती – बहुप्रतीक्षित राज्य मंत्रिमंडळ विस्तार आज झाला आहे.मलबारहिल येथील राजभवनात नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. भाजपचे १०, शिवसेनेचे २ आणि आरपीआयला एक मंत्रीपद मिळाले असून जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघाचे भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना मंत्रीपद मिळाल्याने वरुड मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत मिठाई व गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.

यावेळी ढोल ताशे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. अनिल बोंडे यांना मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आह.दरम्यान, प्रविण पोटे यांचे मंत्री पद काढून अनिल बोंडे यांना मंत्रीपद दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात अनेक नवे समीकरणे तयार होणार आहेत.