‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका घेऊन अमोल कोल्हे प्रेक्षकांच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा : झी मराठी वरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारून डॉ. अमोल कोल्हे राज्यातील घरारात पोहचले आहेत. त्यानंतर ते आता नवी मालिका ‘स्वराज्यजननी जिजामाता’ येत्या 19 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबतची माहिती डॉ. कोल्हे यांनी स्वत: फेसबुकवरून दिली आहे.

Loading...

याबाबत डॉ. कोल्हे यांनी पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले, की ही जगदंब क्रिएशनची दुसरी निर्मिती आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’नंतर पुन्हा एक वेगळं शिवधनुष्य पेलण्याचं आव्हान आहे. शहाजीराजांची स्वराज्यसंकल्पना ज्यांनी जपली, जोपासली आणि स्वराज्यसंस्थापक शिवरायांना घडवलं त्या जिजाऊ मासाहेबांचं जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर आणणं सोनी मराठीच्या माध्यमातून शक्य होत आहे ही आनंदाची बाब आहे आणि तितकीच जबाबदारीचीही! ही मालिका केवळ मनोरंजन नाही तर संस्कार असेल आणि तमाम जिजाऊंच्या लेकींसाठी अभिमानाचा हुंकार असेल !

https://www.youtube.com/watch?v=AU5UMbqYtIALoading…


Loading…

Loading...