fbpx

शिरूरचं मैदान मारल्यानंतर विजयी मावळा पवारांच्या भेटीला…

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचा अभेद्य असा शिरूरचा गड भेदणारे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि नवनिर्वाचित खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे दोघांची ही भेट झाली. यावेळी अमोल कोल्हे यांनी शरद पवारांना भक्ती-शक्ती समूह शिल्प भेट दिले. यावेळी अमोल कोल्हे यांच्यासोबत प्रवीण गायकवाड हे देखील उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे दिग्गज नेते आणि शिरूर लोकसभेचे उमेदवार आढळराव पाटील यांचा पराभव करत आढळरावाचं चौथ्यांदा खासदार होण्याचे स्वप्न भंग केले आहे.

अमोल कोल्हे यांचं फॅन फॉलोविंग शिरूरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. संभाजी मालिकेमुळे ते घराघरात पोहचले आहेत. त्याचाच फायदा त्यांना झाला. दरम्यान, तीन टर्म खासदार राहिलेले आढळराव पाटील चौकार मारण्यात अपयशी ठरले आहे.