कोरोना रोखण्यासाठी पावले न उचलल्यास डॉ.अजित नवलेंचा आत्मक्लेशाचा इशारा

ajit nawale

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, अकोले, श्रीगोंदा ह्या तालुक्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अकोले तालुक्यात तर दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण सापडत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी अकोले तालुक्याचा दौरा करून पाऊले न उचलल्यास तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेश करणार असल्याचा इशारा डॉ.अजित नवले व विनय सावंत यांनी दिला आहे.

शासकीय विश्रामगृह अकोले येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ.नवले म्हणाले की, तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले की दोन-चार कार्यकर्ते बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे गोरगरीब जनतेचे हाल होत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बंद हा एकमेव पर्याय नाही. तालुक्यात कोरोनाच्या टेस्ट वाढविणे गरजेचे आहे. तालुक्यासाठी मोठे कोविड सेंटर उभारणे गरजेचे आहे. सुरुवातीला अकोले तालुक्यात रुग्ण अतिशय कमी होते. मात्र आता संगमनेरच्या पुढेही ही संख्या जाते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. असे नवले म्हणाले.

तालुक्यातील कोविड सेंटरची अवस्था अतिशय दयनिय आहे. तेथे रुग्णांना चहा, नाश्ता, जेवण मिळत नाही. तालुक्यातील पतसंस्था, सोसायटी, दूधडेअरी, उद्योजक, व्यवसायिक, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांनी पुढे येऊन कोविड सेंटर सुरू करावे. असे आवाहन डॉ.अजित नवले यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या:-