डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करूनच प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात यावा

सांगली – सर्व शासकीय व निमशासकीय कार्यलयात “प्रजासत्ताक दिन” साजरा करावा व याकामी कर्त्यव्यात कसूर करणाऱ्यावर व यादिवशी गैरहजर राहणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, गेल्या काही वर्षापासून काही ठिकाणी २६ जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताकदिनी धार्मिक पूजा घालण्यात येवू लागल्या आहेत. याला सरकारने कायद्याने पायबंद घालावे. अशी मागणी स्टुडंट फोरम फॉर सोशल जस्टीस यांनी केली आहे.

ब्रिटिशांच्या जोखडातून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. त्यामुळे देशभरात हा दिवस ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून ओळखला जातो.

Loading...

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन संविधानाचे एकमेव शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करूनच साजरा करावा तसेच शालेय जीवनात संविधानाची ओळख व्हावी, विद्यार्थांना संविधान कळावे म्हणून जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सर्व माध्यमांच्या सर्व शाळांमधून प्रार्थनेच्या वेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करा असा आदेश देणार जी. आर. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन निर्णय दि. ०४.०२.२०१३ रोजी काढला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यलयात “प्रजासत्ताक दिन” साजरा करावा व याकामी कर्त्यव्यात कसूर करणाऱ्यावर व यादिवशी गैरहजर राहणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, गेल्या काही वर्षापासून काही ठिकाणी २६ जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताकदिनी धार्मिक पूजा घालण्यात येवू लागल्या आहेत. याला सरकारने कायद्याने पायबंद घालावे. अशी मागणी स्टुडंट फोरम फॉर सोशल जस्टीसचे प्रमुख अमोल वेटम, जिल्हाअध्यक्ष संजय कांबळे, नितीन सरोदे, गौतम भगत यांनी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की ,भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम , साम्यवादी , धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक आहे. २६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. भारतातील प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक राजकीय पक्षांनी व नेत्यांनी, प्रत्येक संस्था-संघटनांनी, शाळा-कॉलेज आणी मंडळांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदराने आणि अभिमानाने अभिवादन केलेच पाहिजे. जेथे जेथे राष्ट्राध्वजारोहण करून प्रजासत्ताकदिन साजरा केला जातो तेथे तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात यावा.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीया भारताचे संविधान लिहून पूर्ण केले व देशाला अर्पण केले. ज्या दिवशी संविधान देशाला अर्पण करण्यात आले तो २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ आणि ज्या दिवसापसुन संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली तो २६ जानेवारी हा ‘प्रजासत्ताक दिन ‘.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
पुन्हा मोदी सरकार येणार व मी पुन्हा मंत्री होणार : रामदास आठवले
सावधान : मुंबई आणि पुण्यातही आढळले‘कोरोना'चे संशयित रुग्ण