Share

APJ Abdul Kalam Birth Anniversary | ‘अयशस्वी म्हणजे अपयश नाही’ असा संदेश देणारे, डॉ. अब्दुल कलाम यांची आज जयंती

APJ Abdul Kalam | टीम महाराष्ट्र देशा: जगभरात ‘मिसाइल मॅन’ अशी ओळख निर्माण करणारे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती. भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम भारताचे पहिले नागरिक म्हणजेच राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले होते. 15 ऑक्टोबर हा दिवस भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांच्या आठवणीत जगभरात जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी ते सदैव स्मरणात राहतील. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांनी दिलेल्या काही प्रेरणादायी शिकवणी जाणून घेऊया.

भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांचा जन्म रामेश्वरममध्ये 1931 साली झाला. त्यांच्या बालपणाबद्दल सांगायचे झाले तर त्यांचे कुटुंब मोठे असल्यामुळे त्यांचे बालपण गरिबीमध्ये गेले. बालपणी अब्दुल कलामांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले होते पण त्यांनी कधीही हार मानली नाही. वर्तमानपत्र विकण्यापासून अनेक श्रमिक कामे त्यांनी केली होती. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून वैमानिक अभियांत्रिकीचा अभ्यास केल्यानंतर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थांमध्ये काम केले होते. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना भारत सरकारकडून 1990 मध्ये पद्मविभूषण आणि 1997 मध्ये भारतरत्न सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले.

 डॉ. अब्दुल कलाम ( APJ Abdul Kalam ) यांची शिकवण

भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांचे व्यक्तिमत्व असे होते की त्यांनी भारताला स्वतःच्या पायावर उभे राहिले शिकवले. विशेष म्हणजे आर्थिक अडचणीमुळे आणि निराशेमुळे आयुष्याच्या सुरुवातीला आत्महत्या करायला निघालेले डॉ.अब्दुल कलाम यांनी नंतर आपल्या कामाद्वारे लाखो लोकांना जगण्यासाठी प्रोत्साहित केले. डॉ. अब्दुल कलाम यांनी Fail आणि No शब्दांचा खरा अर्थ लोकांना समजून सांगितला.

Fail चा भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांनी सांगितलेला अर्थ

भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांच्या मते Fail म्हणजे First attempt in learning म्हणजेच शिकण्यामधील पहिली पायरी. डॉ.अब्दुल कलाम यांनी निराश झालेल्या विद्यार्थ्यांना सांगितले की अयशस्वी म्हणजे अपयश नाही तर याचा अर्थ आहे शिकण्याचा पहिला प्रयत्न.

भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या मते No चा अर्थ

भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी विचारानुसार No म्हणजे नकार होत नाही, तर No म्हणजे Next Opportunity. तुम्हाला आयुष्यात एकदा नकार मिळाल्यावर खचून जाऊ नका तर त्या नकाराला तुम्ही पुढची संधी म्हणून बघा असे प्रोत्साहन डॉ. अब्दुल कलाम यांनी विद्यार्थ्यांना दिले.

डॉ. अब्दुल कलाम ( APJ Abdul Kalam ) यांचे प्रेरणादायी विचार

  • सर्जनशीलता म्हणजे एकाच गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करणे.
  • हे शक्य आहे की आपल्या सर्वांमध्ये समान प्रतिभा नसेल पण आपल्या सर्वाना आपली प्रतिभा विकसित करण्याची समान संधी आहे.
  • आपल्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या युद्धात जर तुम्ही पराभूत झालात तर “पहिला विजय हा केवळ एक योगायोग होता” अनेक लोक हेच म्हणण्याच्या तयारीत असतात.
  • आपल्या सगळ्यांकडे सारखेच टॅलेंट नसते आणि ते असणे आवश्यकही नसते, पण आपल्या सगळ्यांकडे ते टॅलेंट जोपासून, त्याला वाढवण्याच्या संधी मात्र सारख्याच असतात.
  • जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात. मात्र, गरूड पावसापासून बचाव करण्यासाठी ढगांवरून उडतो.
  • स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडतात, तर खरे स्वप्न ते असतात जे पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला झोपुच देत नाहीत.

महत्वाच्या बातम्या 

APJ Abdul Kalam | टीम महाराष्ट्र देशा: जगभरात ‘मिसाइल मॅन’ अशी ओळख निर्माण करणारे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now