‘…तर डॉ. आंबेडकरांनादेखील देशद्रोही ठरवलं असते’

टीम महाराष्ट्र देशा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीवादी होते. एका आधुनिक समाज उभारणीसाठी डॉ. आंबेडकर झटत होते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता त्यांनादेखील या वातावरणात देशद्रोही ठरवले असते असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी केले.

Rohan Deshmukh

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तेलतुबंडे यांनी आपले मत व्यक्त केले. आनंद तेलतुंबडे यांनी सांगितले की, हिंदूबहूल देशात मुस्लिम सुरक्षित राहू शकत नाही असे वातावरण तयार केले गेले. त्यामुळेच त्यांनी स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीला पाठिंबा व्यक्त केला होता. मात्र, त्याचवेळेस डॉ. आंबेडकर बळजबरी करुन एखाद्या करारावर स्वाक्षऱ्या करुन घेण्याऐवजी जनमतासाठीदेखील आग्रही असल्याचे तेलतुंबडे यांनी सांगितले. मात्र, आजच्या परिस्थितीत त्यांची ही भूमिका देशद्रोहीपणाची ठरवून त्यांच्यावर खटला दाखल झाला असता असेही त्यांनी सांगितले.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...