मुंबई : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईत होणार असून, २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर हे पाच दिवस अधिवेशन पार पडणार आहे. अधिवेशनाच्या कामकाजाच्या कमी कालावधीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र हा कालावधी पाच दिवस ठेवण्यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. यावर आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे.
भारतीय संसदेचे हिवाळी अधिवेशन हे 19 दिवस चालणार आणि महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन हे 5 दिवसांचे होणार.
आज महाराष्ट्रात डझनभर प्रश्न प्रलंबित आहे अशावेळी सुनावणीसाठी ५ दिवस योग्य आहे का ? ५ दिवसात प्रश्न विचारून होतील का?
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) December 5, 2021
सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणाले, भारतीय संसदेचे हिवाळी अधिवेशन हे १९ दिवस चालणार आणि महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन हे ५ दिवसांचे होणार. आज महाराष्ट्रात डझनभर प्रश्न प्रलंबित आहे, अशावेळी सुनावणीसाठी ५ दिवस योग्य आहे का ? ५ दिवसात प्रश्न विचारून होतील का? असा प्रश्न सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.
अधिवेशनात लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. आरटीपीसीआर चाचणी देखील अनिवार्य करण्यात आली आहे. दरआठवड्याला ही चाचणी होणार आहे. मंत्री, राज्यमंत्री यांच्यासोबत केवळ एकाच अधिकाऱ्याला प्रवेश दिला जाणार असून, विधानमंडळ सदस्यांचे स्वीय, सहायक, वाहनचालकांसाठी विधान भवनाच्या बाहेरील प्रांगणात स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे. या काळात खासगी व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. असा निर्णय या बैठकीत झाला होता.
महत्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जी आल्या व महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या- संजय राऊत
- ‘मुंबईला ओरबाडून ज्यांना आपली राज्ये विकसित करायची आहेत त्या राज्यांचा विकास म्हणजे तात्पुरती सूज’
- ‘… पण महाराष्ट्राप्रमाणेच बंगाल झुकणार नाही’, ममता बॅनर्जींचा इशारा
- ‘…आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत’, आदित्य ठाकरेंना बॅनर्जींचा सल्ला
- …तेव्हा काश्मीरमध्ये शांतता होती का?- अमित शहा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<