सरकार मिलिंद एकबोटे, संभाजी भिडेंना अटक करेल याबद्दल शंका – कपिल पाटील

पुणे: कोरेगांव भीमा दंगली घडविण्यामध्ये ज्या मिलिंद एकबोटे, संभाजी भिडेंचा हात आहे. अशा लोकांना हे सरकार अटक करेल काय याबद्दल शंका असून हे सरकार बदमाश आहे, असा आरोप पुण्यात एका कार्यक्रमात आमदार कपिल पाटील यांनी केला.

राज्यात सध्या हिटलरशाही सरकार असल्याचेही ते म्हणाले.या सरकारने शिक्षणाचा बाजार मांडला असून जिल्हा परिषदांच्या शाळां बंद करुन रामदेवबाबा यांच्या गुरुकुल आणि खासगी कंपन्याना त्या देण्याचा डाव आखला जातो आहे. त्यामुळे हा जो खासगीकरणाचा डाव आहे तो आम्ही उधळुन लावल्याशिवाय शांत राहणार नाही, असे पाटील यांनी सांगितले. भाजप देशात जातीजातीमध्ये वाद निर्माण करुन तरुणांची माथी भडकविण्याचे काम करत आहे, असा आरोपही आमदार कपिल पाटील यांनी यावेळी केला.