‘जय श्रीराम न म्हणणाऱ्यांच्या डीएनएवर शंका’, योगी आदित्यनाथांचे वादग्रस्त वक्तव्य

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज दि. ४ ऑगस्ट, बुधवारी गोरखपूरमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी ‘लाईव्ह हिंदूस्तान’च्या शशी शेखर यांच्याशी संवाद साधला. मुलाखती दरम्यान योगींनी जय श्रीराम ही जयघोषणा न म्हणणाऱ्यांवर टीका केली. जय श्रीराम न म्हणणाऱ्यांच्या डीएनएवर मला शंका असल्याचे योगींनी सांगितले.

ते म्हणाले, उत्तर प्रदेशच नाही भारतातील कोण्या व्यक्तीला जय श्री राम म्हणण्यात काही अडचण असेल असं मला वाटत नाही. राम आपले पूर्वज आहेत. आपल्याला यावर गर्व असायला हवा. ज्या लोकांना असं वाटत नाही त्यांच्या डीएनएबाबत माझ्या मनात शंका आहे.

‘राम आपले पूर्वज आहेत. मी हे म्हणत नाहीये, जगातील सर्वात मोठी मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशिया आपले पूर्वज रामाला मानतो. इंडोनेशियात मुस्लिम देखील रामलीला करतात. आपण कोणत्या युगात जगत आहोत. राम आपले पूर्वज असल्याचा आपल्याला अभिमान असायला हवा. आपल्याला गर्व वाटायला हवे. इंडोनेशियाला यावर गौरव वाटत असेल तर आपल्याला का वाटू शकत नाही. रामाशी आपला संबंध असल्याचा आपल्याला अभिमान असायला हवा. जर काहींना असे वाटत नसेल तर मला त्यांच्या डीएनएवर शंका येते’ असेही योगी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या