Gopichand Padalkar | पुणे : अर्हम फाऊंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संवाद स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी’ हा कार्यक्रम पुण्यात पत्रकार भवनात आयोजित केला होता. पुण्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या संवाद या कार्यक्रमात बोलताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिला आहे.
पुण्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमासाठी विधानसभा आमदार अभिमन्यू पवार , सदाभाऊ खोत , बच्चू कडू , आमदार निरंजन डावखरे आणि विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी एमपीएससी नाही झाला तर आमदार आणि खासदार होता येतं, असा अजब सल्ला यांनी दिला आहे.
त्याचबरोबर आमदार आणि खासदाराने कधी आत्महत्या केल्याचं तुम्ही ऐकलं आहे का?, असा सवालच गोपीचंद पडळकर यांनी विद्यार्थ्यांना केला आहे. एमपीएससी नाही झाला तर चिंता करू नका, झेडपी मेंबर होता येईल. एमपीएससी नाही झाला तर आमदार, खासदार होता येईल. जो तो म्हणतो एमपीएससीत स्पर्धा मोठी आहे. पण तसं नाही. इथे 12 कोटीतून 288 आमदार विधानसभेत आहेत. ही किती मोठी स्पर्धा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या कार्यक्रमात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची जीभ घसरली. राज्यकर्ते रेड्यांची औलाद आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. राज्यकर्त्यांना डोक्याची भीती वाटत असते कारण जिकडे जास्ती डोकी तिकडे सगळे राज्यकर्ते बोलायला लागतात. राज्यकर्ते बोलायचे असतील तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखे रेड्याच्या पाठीवर हात ठेवावे लागतील. कारण राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद असते. त्यांच्या पाठीवर हाथ ठेवल्याशिवाय ते बोलत नाहीत, असं म्हणत त्यांनी राजकीय नेत्यांवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sadabhau Khot | “राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद असतात, त्यांना…”; सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली
- Deepak Kesarkar | “कुणीही उठायचं आणि मुख्यमंत्र्यांवर घसरायचं…”, दीपक केसरकर संतापले
- ShivendraSingh Raje Bhosale | “ज्या घराण्याचे वारस आहात त्याच घराण्यातील…” ; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उदयनराजेंना टोला
- Nana Patole | “एकनाथ शिंदे भ्रष्टाचार करुन मुख्यमंत्री झाले”, नाना पटोले यांचा गंभीर आरोप
- Nana Patole | “मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा राजीनामा घ्या”; नाना पटोलेंची आक्रमक भूमिका