कर्नाटकात अस्थिरतेचे ढग;कुमारस्वामींनी केली मोठी भविष्यवाणी

blank

टीम महाराष्ट्र देशा : ‘मला जर जनतेचा आशीर्वाद मिळाला तर मी पुन्हा एकदा कर्नाटकचा मुख्यमंत्री होईल’, असे विधान कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले होते. त्यांच्या विधानानंतर आता कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनीही मुख्यमंत्रिपदाबाबत एक मोठे विधान केले आहे. सप्टेंबरला कोणीतरी नवीन व्यक्ती मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं मला समजलंय. मी किती कालावधीपर्यंत मुख्यमंत्री म्हणून राहणार हे महत्त्वाचं नाही. तर चांगलं कार्य करणं माझ्यासाठी महत्त्वाचे आहे आणि हीच गोष्ट माझं भविष्य सुरक्षित करेल’, असं कुमारस्वामी म्हणालेत

दरम्यान, कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएस आघाडीच्या सरकारमध्ये कोणतीही गोष्ट सुरळीत सुरू आहे, असे दिसत नाहीय. दोन्ही पार्टीतील नेत्यांकडून चालता-बोलता अशी काही विधानं केली जात आहे, की ज्यावरुन येथील आघाडी सरकारमध्ये केव्हाही बिघाडी निर्माण होऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.

नाशिकमध्ये सेनेला लॉटरी : भाजप,राष्ट्रवादी,काँग्रेस,मनसे,जनता दलाला धक्का, नरेंद्र दराडे विजयी