‘राष्ट्रवादीला मतदान करून मतं वाया घालू नका’

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेते एकमेकांवर टीका करत आहेत.

राज्याच्या ग्रामविकास मंत्री आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे याही वेगवेगळ्या माधमातून जनतेपर्यंत पोहोचत आहेत. एका कार्यक्रमात बोलताना मुंडे यांनी गेल्या पाच वर्षात मंत्री म्हणून काम करत असताना भरभरून विकास निधी देण्याबरोबरच विवाह सोहळा, महाआरोग्य शिबीर, बचतगटांच्या माध्यमातून मी तुमची सेवा केली. भविष्यातही मीच मंत्री म्हणून तुमची सेवा करणार आहे असं विधान केले आहे.

पुढे बोलताना त्यांनी ‘ज्या पक्षाला भविष्य नाही, ज्यांचा जिल्हयात अथवा मराठवाड्यात एकही आमदार, खासदार नाही त्यांच्या मागे जाताच कशाला? असा सवाल करून महाराष्ट्रात पुन्हा भाजपचेच सरकार येणार आहे, विनाकारण मतं व्यर्थ घालू नका असं विधान केले आहे. त्यांचा रोख हा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे होता. त्यामुळे राष्ट्रवादीकडून आता काय उत्तर येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पुढे बोलताना त्यांनी भाजप सरकारने एवढी कामं केली असताना राष्ट्रवादीला मतं देऊन मत वाया घालू नका. मी निवडून आलेले आहे मी पडत नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एका एका गावासाठी १०-१० कोटींचे काम झाल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. त्या हाळम येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होत्या.