बलात्काराच्या घटनेचा वापर राजकाराणासाठी करू नये, स्मृती इराणी संतापल्या

टीम महाराष्ट्र देशा : तेलंगणा पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे पडसाद आज लोकसभेतही पाहिला मिळाले. तर महिलांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीचं शाब्दिक चकमक पाहिला मिळाली. यावेळी भाजप खा. स्मृती इराणी आणि कॉंग्रेस खा. आधी रंजन चौधरी यांच्यात आरोप – प्रत्योरापाच्या फैरी झाडल्या.

महिलांचा बलात्काराच्या घटनेचा वापर राजकारणासाठी करु नये, असे आवाहन स्मृती इराणी यांनी केले. तर देशात एका बाजूला राम मंदिर बांधले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला सीतामातेला जाळण्याचं काम होतंय. उन्नावमध्ये बलात्कार पीडितेला जाळण्यात आलं. त्यात ९५ टक्के पीडित युवती भाजली. नेमक देशात चाललंय तरी काय? असा प्रश्न कॉंग्रेस नेते आधी रंजन चौधरी यांनी सभागृहात उचलून धरला.

Loading...

या प्रश्नाल उत्तर देतानाचं स्मृती इराणी यांनी महिलांचा बलात्काराच्या घटनेचा वापर राजकारणासाठी करु नये, असे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, महिला सन्मानाचा विषय धर्माशी जोडणं चुकीचं आहे. यापूर्वी मी असं कधी पाहिले नाही. बंगाल पंचायत निवडणुकीत बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून वापरलं जातं. बंगालमधील एक खासदार आज मंदिराचं नाव घेतात. ज्यांनी बलात्काराचा राजकीय फायद्यासाठी वापर केला ते भाषण देतायेत. उन्नाव असेल वा तेलंगणा ज्या घटना घडल्या ते दुर्दैवी आहेत. दोषींनी फाशी मिळायला हवी पण त्यावर राजकारण करु नका, असं इराणी म्हणाल्या.

तसेच शिवसेना खा. अरविंद सावंत यांनीही महिला सुरक्षेच्या मुद्यावर चांगलाचं आवाज उठवला. ते म्हणले की, महिला सुरक्षेसाठी कडक कायद्याची गरज असून अशाप्रकारचे गुन्हे थेट सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी यावेत. सध्याच्या न्याय प्रक्रियेमध्ये कनिष्ठ न्यायालयापासून हे सुरु होतं. अनेक खटले वर्षोनुवर्ष सुरुच राहतात. त्यामुळे या मुद्यावर लोकसभा अध्यक्षांनी समिती गठित करुन चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान तेलंगणाच्या राजधानीजवळील शादनगर गावात 7 नोव्हेंबरला एक धक्कादायक प्रकार घडला होता. अज्ञात लोकांनी वेटरनरी महिला डॉक्टरवर बलात्कार करून पेटवून ठार मारले होते. या घटनेनंतर दोषींना लवकरात लवकर फाशीच्या शिक्षेची मागणी होत होती. त्यासाठी देशभरात आंदोलनं होतं होती. मात्र आज या आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. तेलंगणा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे देशातून पोलिसांचे आणि तेलंगणा सरकारचे कौतुक केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...