fbpx

खेचराला घातली पुणेरी पगडी ; पुण्यातील पदवीदान समारंभात गोंधळ

टीम महाराष्ट्र देशा : पुणे विद्यापीठाचा ११४ वा पदवीदान समारंभ आज पार पडला.मात्र कुलगुरू आणि मान्यवरांनी वापरलेल्या पुणेरी पगडीमुळे विद्यापीठाच्या आवारात काहीसा गोंधळ पाहिला मिळाला. विद्यापीठात पेशवाईकरण करण्याचा घाट घातला जात आहे.तो आम्हाला चालणार नाही,असं म्हणत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने अनोखे निदर्शने आज विद्यापीठाच्या आवारात केले.विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पुणेरी पगडी वापरु नका, अन्यथा विद्यापीठाच्या आवारात पुणेरी पगडी घातलेलं खेचर आणू, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस आकाश झांबरे पाटील यांनी दिला होता.

मात्र यावर्षी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पुणेरी पगडीचा वापर करण्याचे याअगोदरच ठरले होते.त्यामुळे ठरल्याप्रमाणे आज झालेल्या समारंभात पुणेरी पगडीचा वापर करण्यात आल्याने विद्यार्थी संतप्त झाले होते.त्यांनी सांगितल्याप्रमाणेच आवारात पुणेरी पगडी घातलेलं खेचर विद्यापीठात आणून निषेध व्यक्त केला. तर पुणेरी पगडी नको फुले पगडी हवी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने यावेळी केली.

या वादाला पार्श्वभूमी आहे ती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पुण्याच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना पुणेरी पगडी टाळून फुले पगडी घातली होती.तर यापुढे पुणेरी पगडी टाळून फुले पगडीच राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात वापरली जाईल असे आदेश राष्ट्रवादी काँगेसच्या कार्यकर्त्यांना पवारांनी दिले होते.त्यामुळे पुण्यात सुरु असलेल्या पगडीच्या या वादाची ठेनगी पवारांच्या याच कार्यक्रमात पडली असल्याची चर्चा आहे.