‘सत्ताधाऱ्यांना नियम कायदे लागू नाहीत का?’; शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाजपाचा हल्लाबोल

अतुल भातखळकर

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा ष्ण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. तीथे ठाकरे सरकारच्या नियमानुसार ५० टक्के उपस्थिती असणार आहे का? राज्यातील नाट्यगृह आणि सिनोमागृहांना २२ ऑक्टोबरपासून परवानगी असताना सत्ताधारी पक्ष म्हणून १५ ऑक्टोबरची विशेष सवलत का ? सत्ताधाऱ्यांना नियम कायदे का लागू नाहीत?. गर्दी जमवणारे सत्ताधारी पक्षाचे नेते संजय राठोड, अजित पवार, भाई जगताप, स्वतः मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजतात का? असा सवाल करत भाजपनेते आ. अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने होणार नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्याप्रमाणे यंदाचा दसरा मेळावा माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये होणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जा शिवसैनिकाचे लक्ष लागून असलेल्या दसरा मेळाव्याची जागा अखेर ठरली असून, यंदाचा दसरा मेळावा हा गेल्यावर्षी प्रमाणे हॉलमध्येच होणार आहे.गेल्यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दसरा मेळावा पार पडला होता. मात्र यंदा षण्मुखानंद सभागृहात ५० टक्के उपस्थितीत दसरा मेळावापार पडणार आहे.

शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते उपनेते, मंत्री, मुंबईचे आमदार, महापौर आणि मुंबई महानगरपालिकेतले काही काही महत्वाचे नगरसेवक या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. राज्यात कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नसल्याने शिवाजी पार्क ऐवजी शिवसेनेने यंदाही दसरा मेळावा हॉलमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या