कोरोनाचं युध्द जिंकायचंच… घाबरू नका; पण रहा जागरूक

corona

करमाळा : सध्या महाभयंकर अशा ‘कोरोना’ रोगाने जगभरात थैमान घातले आहे.चीन ची भिंत ओलांडून "कोरोना" व्हायरस भारतात पोहचल्यामुळे सध्या भितीचे वातावरण तयार झालेले असून यावर जागतिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असल्यातरी सर्वांना ‘कोरोना’शी दोन हात करून सामना करावा लागणार आहे, त्यासाठी घाबरून न जाता सर्वांनी जागरूक राहिले पाहिजे.

‘कोविड १९’ म्हणजेच ‘कोरोना’ विषाणू ने जगभरात उद्रेक केला आहे.भारतात ही हा महाभयंकर रोग दाखल झालेला आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी उच्च पातळीवर उपाययोजना करण्यासाठी सरकार अत्यावश्यक पाऊल उचलत आहे. कोरोनाचा मृत्यूदर हा २.४% इतका असल्यामुळे घाबरू नका जागरूक राहणे गरजेचे आहे.

चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या ह्या प्राणघातक ‘कोरोना’ व्हायरस विषाणूमुळे आतापर्यंत सुमारे ५ हजार लोकांचा जीव गेलेला आहे. ‘कोरोना’ ची सध्याची तीव्रता पाहता हा साथीचा रोग असून संसर्गजन्य रोग आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ला महाभयंकर साथीचा रोग असाल्याचे जाहीर केलेले आहे.

कोरोना विषाणू हा जास्त उष्ण वातावरणात राहू शकत नाही, प्रत्येकांनी काळजी घेऊन शक्यतो सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क किंवा रूमालचा वापर करावा,किरकोळ सर्दी,खोकला,ताप,घसा खवखवणे अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

कोरोना व्हायरस म्हणजे काय?

कोरोना व्हायरस हा एक संसर्गजन्य रोग असून महाभयंकर विषाणू आहे. कोरोना विषाणू जनावरांमधून मानवापर्यंत पोहोचलेला आहे.

कोरोना ची लक्षणे

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास ताप, सर्दी, दम लागणे,घसा खवखवणे,शिंका येणे, खोकला तसेच उलट्या होणे,अशक्तपणा जाणवणे यासारखी लक्षणे आढळून येतात

कोरोना विषाणूंची लागन कशी होते?

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते कोरोना विषाणू हा प्राण्यांतून मानवांमध्ये पसरला आहे.परंतु सध्यातरी कोरोना हा विषाणू माणसापासून माणसापर्यंत पसरत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या एखाद्याशी संपर्क झाला, तर लगेचच दुसऱ्या व्यक्तीला ही कोरोनाची लागन होते.

कोरोनावर उपचार

या महाभयंकर अशा संसर्गजन्य रोगावर जगभरात कसल्याही प्रकारचा उपचार उपलब्ध झालेला नसून कोरोना व्हायरस कसल्याही प्रकारची लस सध्यातरी उपलब्ध नाही. यावर उपाय म्हणजे जागरूक राहणे आणि कोरोनाशी दोन हात करून सुरक्षित राहणे.

कोरोना विषाणूंची लागण होऊ नये यासाठी काय करावे?

कोरोनाची लागन टाळण्यासाठी पहिला उपाय म्हणजे जागरूक राहणे. आपल्या बाजूला जर आजारी असलेल्या व्यक्तीला – सर्दी,ताप, खवखवणे आणि न्यूमोनिया झालेला एकादा व्यक्ती आढळल्यास अशा व्यक्तींचा संपर्क टाळावा, शक्यतो तोंडाला एक मास्क लावून ठेवणे आणि . डोळे, नाक आणि तोंडाला जास्त उघड्या हाताने स्पर्श करणे टाळावे.

कोरोना टाळण्यासाठी गर्दीचा प्रवास करू नका. लग्न, मेळावे, जत्रा अशा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
सतत आपले हात साबण तसेच बाजारात उपलब्ध असलेया हँड वॉश तसेच हँड सॕनिटायजर चा वापर हात धुण्यासाठी करावे

या अगोदर आलेले साथीचे रोग

जगभरात कोरोना अगोदर

प्लेग, पोलिओ, एचआयव्ही, डेंग्यू, मलेरिया, हेपेटायटिस, रेबिज, धनुर्वात, कांजण्या, अ‍ॅनिमिया, कुपोषण, कॉलरा, क्षयरोग, कुष्ठरोग, टायफॉइड, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू,इबोला सारखे रोग येऊन गेलेले आहेत

जागरूकता आणि खबरदारी महत्त्वाची

कोरोना चा विळखा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी जागरूकता आणि खबरदारी महत्त्वाची आहे.तरच कोरोनाशी लढता येऊ शकते.