fbpx

माझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या रोखठोक आणि बिंदास्त वक्तव्यावरून कायम चर्चेत असतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार असूनही विरोधी पक्षाच्या नेत्यांची जाहीर सभेत कौतुक करूनही पक्ष त्यांच्यावर कसलीही कारवाई करत नाही.आता पुन्हा खासदार उदयनराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीरसभेत तोंड भरून कौतुक केले आहे.त्यासोबत त्यांनी महिन्याभरात माझं लग्न आहे. काही महिन्यांनी सगळ्यांचंच लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका. असं उदयनराजेनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पहात सूचक वक्तव्य आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पाटणमध्ये केलेल्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.यावेळी त्यांनी महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री लाभला असल्याचही त्यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारचे निर्णय घेण्याचे धाडस सत्तेत असताना दाखवले आहे तसे कोणीही दाखवले नाही असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे. लोकनेते म्हणावेत असे खूप कमी नेते आहेत, समाजाची जाणीव असणारे खूप कमी नेते सध्या उरले आहेत असेही उदयनराजेंनी म्हटले आहे. शिवसेनेचे शंभूराजे देसाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते खासदार उदयनराजे भोसले हे एकाच मंचावर होते.