मतदारांचे हात-पाय बांधून भाजपला मतदान करायला आणा : येडियुरप्पा

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटकमधील निवडणुकीला जेमतेम एक आठवडय़ाचा कालावधी राहिलेला असतानाच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असलेल्या येडियुरप्पा यांनी प्रचारादरम्यान एक वादग्रस्त विधान केलं आहे. जे मतदार मतदान करणार नाहीत, त्यांचे हात-पाय बांधून त्यांना मतदान केंद्रावर आणा आणि भाजपला मत देण्यासाठी भाग पाडा’ असा अजब सल्ला भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे.

नेमकं काय म्हणाले येडियुरप्पा?

‘आता आराम करत बसू नका. तु्म्हाला वाटत असेल, की एखादा मतदार मतदान करत नाहीये, तर त्यांच्या घरी जा, त्यांचे हात-पाय बांधा, आणि त्यांना महांतेश दोड्डागुदर यांना मत देण्यासाठी घेऊन या’

महांतेश दोड्डागुदर हे कर्नाटकातील कित्तूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारादरम्यान बेळगावी जिल्ह्यात येडियुरप्पा यांनी हे वक्तव्य केलं.येडियुरप्पा यांच्या या वादग्रस्त सल्ल्या नंतर कॉंग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. येडियुरप्पा मतदारांना धमकावत असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

You might also like
Comments
Loading...