अमित शहांनी घेतली राज्यसभेतील दांडी बहाद्दर खासदारांची शाळा

amit shah

वेबटीम : सोमवारी राज्यसभेत राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाच्या घटनात्मक विधेयकाला संमती देताना सरकारच्या नाकावर टिच्चून विरोधकांनी राज्यसभेमध्ये दुरुस्त्या मंजूर करून घेतल्या. हीच गोष्ठ सध्या भाजपसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.

पुरेसे संख्याबळ असताना हि दांडी बहाद्दर खासदारांमुळे भाजपला नामुष्की पत्करावी लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावरून चांगलेच संतापले असल्याच दिसून येत आहे. यानंतर आता भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यसभेतील खासदारांचे चांगलेच कान उपटले आहेत.

‘तुम्हाला राज्यसभेचे तिकीट देताना हजारो नेत्यांची इच्छा डावलली. पण तुमच्यासाठी (एवढे) करूनही तुम्ही राज्यसभेत हजर राहणार नसाल, पक्षादेश काढूनही महत्त्वाच्या विधेयकावेळी अनुपस्थित राहणार असाल तर त्याची गंभीर दखल घ्यावी लागेल’ असे म्हणत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दांडी बहादर खासदारांना सुनावळे आहे  गैरहजेरीचा आणि बेशिस्तीचा प्रकार पुन्हा झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. असा इशारा देखील शहा यांनी दिला आहे.