बॅटमॅन भाजप आमदार म्हणतो, यापुढे महात्मा गांधींच्या मार्गानं चालणार

टीम महाराष्ट्र देशा : इंदूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटनं मारहाण केल्याप्रकरणी तुरंगात असलेले भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांची आज सुटका करण्यात आली. विजयवर्गीय यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी इथून पुढे महात्मा गांधींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गानं चालण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितल आहे. तर त्या घटनेबद्दल पश्चाताप होत नसल्याचं देखील ते म्हणाले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांचे आमदारपुत्र आकाश विजयवर्गीय यांनी इंदूरमध्ये महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. हे कर्मचारी गंजी कंपाउंडमधील मोडकळीस आलेली इमारत तोडण्यासाठी आले असता आकाश यांनी त्यांच्यावर बॅटच्या सहाय्याने हल्ला केला होता.

मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर देखील व्हायरल झाला होता. विभागीय अधिकारी धिरेंद्र बायस यांचा एका भाडेकरूशी वाद सुरु होता. इतक्यात, आमदार आकाश विजयवर्गीय तिथे पोहोचले आणि त्यांचाही अधिकाऱ्यांशी वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आकाश यांनी हातात बॅट घेत धिरेंद्र बायस यांना मारहाण केली.