‘धर्माच्या भावनांशी खेळू नका’; राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपांवर शिवसेना खासदाराचा इशारा

shivsena ram mandir

मुंबई : अयोध्येतल्या वादग्रस्त आणि बहुचर्चित राम मंदिरासाठीच्या भूखंडाच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी रविवारी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाराचाराचे गंभीर आरोप केले आहेत. तसेच या भ्रष्टाचाराची सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून चौकशी व्हावी अशी मागणीही केली.

राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटांत 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या आरोपामुळे आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राम मंदिर पुन्हा एकदा प्रश्नांच्या वादळात अडल्याचे दिसत आहे. संजय सिंह यांनी काही कागदपत्रांच्या आधारे हा आरोप केला आहे. संजय सिंह यांच्या या आरोपांनंतर आता देशातील राजकारण तापू लागले आहे.

आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी देखील याबाबत भाष्य केलं आहे. ‘राम मंदिर जमीन घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे. राम मंदिराबद्दल आमच्या भावना स्पष्ट आहेत. धर्माच्या भावनांशी खेळू नका,’ असं विधान अरविंद सावंत यांनी केलंय.

महत्वाच्या बातम्या