ड्रग्जची नको सोन्याची तस्करी करा; भाजपा आमदाराचा अजब सल्ला

नवी दिल्ली : अमली पदार्थांची तस्करी करु नका. तर सोन्याची तस्करी करा असा अजब सल्ला एका भाजपा आमदाराने दिला आहे. अर्जुन लाल गर्ग असं त्यांचं नाव आहे.गर्ग म्हणाले की, अमली पदार्थांची तस्करी करताना पकडल्या गेल्यास तो अजामीनपात्र गुन्हा ठरतो. त्यापेक्षा सोन्याची तस्करी करा. तुम्हाला सहज जामीन मिळेल.

दरम्यान आता भाजपा आमदार अर्जुन लाल गर्ग यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. देवासी समुदायाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना गर्ग यांनी बेताल वक्तव्य केलं. गर्ग यांच्या विधानाची व्हिडीओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. देवासी समुदायाला संबोधित करताना गर्ग यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाचा संदर्भ दिला. ‘अमली पदार्थ विरोधी कायदा 1985 अंतर्गत कितीजण जोधपूरच्या तुरुंगात आहेत, असा प्रश्न मी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावेळी बिष्णोई समाजापेक्षा देवासी समुदायचे जास्त लोक तुरुंगात असल्याचं मला समजलं,’ असं गर्ग म्हणाले.

अमली पदार्थांच्या तस्करीमुळे होणारी शिक्षा टाळण्यासाठी त्यांनी एक धक्कादायक सल्ला यावेळी दिला. ‘अमली पदार्थांची तस्करी करुन तुरुंगात जाण्यापेक्षा सोन्याची तस्करी करा. सोन्याच्या तस्करीत लवकर जामीन मिळतो,’ असं गर्ग यांनी म्हटलं.

You might also like
Comments
Loading...