मनुस्मृतीला विरोध थांबवा, अन्यथा तुमचाही पानसरे, दाभोलकर करू; छगन भुजबळांना धमकी

नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अज्ञातांकडून धमकी देण्यात आलीय. मनुस्मृतीला विरोध केल्यास ठार मारण्याची धमकी देणारं पत्र छगन भुजबळांना पाठवण्यात आलंय. त्यामुळे नाशिकसह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मनुस्मृतीला विरोध केल्यास तुमचा ‘पानसरे-दाभोलकर’ करु, अशी धमकी देणारं मजकूर असलेलं पत्र नाशिकमधील ‘भुजबल फार्म’वर पाठवण्यात आलंय. पत्र निनावी असल्याने नेमकं कुणी हे पत्र पाठवलं, ते कळू शकलेलं नाहीय.

‘भुजबळ फार्म’वर हे निनावी पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामुळे हे पत्र कोणी पाठविले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केल्याचे समजते. तसेच, या धमकीच्या पत्रामुळे ‘भुजबळ फार्म’वर अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा होत आहेत.

हरीश साळवे यांना जीवे मारण्याची धमकी 

पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांची धावाधाव

माओवाद्यांचा ‘थिंकटँक’ साईबाबाला सोडवण्यासाठी आखला जातोय मास्टरप्लॅन