‘मावळा’ जर वेटर म्हणून दिसला तर जिथे दिसेल तिथे ठोकण्यात येईल

Sambhaji bridged

पुणे: हॉटेल आणि केटरिंग व्यावसायिकांनी वेटर्सला मावळ्यांचा ड्रेस कोड न देण्याचा खबरदारीचा इशारा संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला. मावळा जर वेटर म्हणून दिसला तर जिथे दिसेल तिथे ठोकण्यात येईल. तसेच व्यावसायिकांचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

लग्नसोहळ्यांमध्ये, हॉटेल आणि केटरिंग या ठिकाणी कर्मचाऱ्यांना मावळ्यांचा पोशाख दिला जातो. ज्यामध्ये ऐतिहासिक पगडी, भाला घालून कर्मचारी काम करतात. त्यामुळे हा मावळ्यांचा अपमान असून आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘मावळे’ ही मराठी मनाची अस्मिता आहे. मावळे हे महाराष्ट्राचा अभिमान आहे. ज्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. हा अवमान महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता कदापी सहन करणार नाही. त्यामुळे मावळा जर वेटर म्हणून दिसला तर जिथे दिसेल तिथे ठोकण्यात येईल. असा संभाजी ब्रिगेड कडून सांगण्यात येईल.